Saturday, 3 December 2016

नोटबंदी

माझ्या लेखणीतुन.......


निर्णय नोटबंदीचा.....*
नोटबंदीचा निर्णय झाला आणि सर्वप्रथम मला आठवण झाली ती श्रीमान रतनजी टाटा यांची. त्यांचे वाक्य मी आवर्जुन या ठीकाणी लिहीतोय..... *मी थेट निर्णय घेतो, तो चुक की बरोबर याचा फारसा विचार करत नाही पण निर्णय घेतला की त्याच्या परिपूर्णतेसाठी माझे अथक प्रयत्न चालु असतात.* कोणताही निर्णय घेतला की त्याप्रमाणे नियोजन करणे गरजेचे असते आणि त्याच्या पुढची पायरी ती म्हणजे त्याची अंमलबजावणी. नोटबंदी निर्णय फक्त आम्हाला दिसला पण त्याचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात सरकार पुर्णपणे अपयशी ठरलंय..... मी टिका करत नाही. घेतलेला निर्णय हा स्वागतार्य आहेच पण.. पुर्ण नियोजनाच्या आधारे काही प्रमाणात का होईना झालेला त्रास नक्कीच कमी करता आला असता.... नोटबंदीनंतर काही टीकाकार थेट पंतप्रधानांवर निषाणा साधु लागले. टिकाकारांचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे कोणतीही चांगली गोष्ट करा ते त्यातुन वाइटच शोधुन काढणार... असो.... प्रामाणिक पणे सांगायचे झाले तर सध्याचे पंतप्रधान हे इतरांच्या तुलनेत नक्कीच चांगले आहेत... आणि प्रत्येक वेळि   टिका करुन चालत नाही *एखादी गोष्ट जर चुकीची वाटत असेल तर बरोबर काय आहे हे आपल्याला सांगणे जरुरी आहे नुसतं चुका काढणे योग्य नसतं*... आपल्याला जर पंतप्रधान चुकिचा वाटत असेल तर मला तर असं वाटतं सध्याच्या राजकारणात पर्यायी पंतप्रधान शोधणे अवघडच आहे. असा एकही व्यक्ति नाहीए जो पंतप्रधान या पदाला साजेसा आहे. मग जर एखाद्या गोष्टीला पर्याय च नसेल तर जी आहे ती चांगली कशी होईल या दृष्टिने विचार करुन तसा प्रयत्न करायला हवा.... सध्याच्या पंतप्रधानांचा विचार करता मनात कुठेतरी विश्वास निर्माण होतो की हा माणुस काही तरी बदल नक्की घडवुन आणेल...  सगळ्यात महत्वाचे मी मोदी भक्त नाही त्यांचा पक्ष कोणता याच्याशी काहिएक देणघेणे नाही आणि आरएसएस शी माझा तिळमात्र संबंध नाही.... मोदी जी एक व्यक्ति म्हणुन मी त्यांचा आदर करतो आणि काही तरी चांगले घडउन आणतील अशी अपेक्षा बाळगतो....
.
         आपला हितचिंतक
            निळकंठ तांबे
             ९४०४ ७७ २२ ००

Wednesday, 14 September 2016

पु.ल.देशपांडे लिखित

पु. ल. देशपांडे (सामना, २५ नोव्हेंबर १९९०)
जोतिबांना आपले द्रष्टे पूर्वज मानून त्यांचा वारसा सांगायचा असेल तर जात, वर्णवर्चस्व, मूर्तीपूजा असल्या गोष्टींचा त्याग आचरणाने सिद्ध करून दाखवावा लागेल. हे सोपे नाही. त्यासाठी आप्तस्वकीय आणि मित्रांचा दुरावा सहन करावा लागेल. वयाने वडील असलेल्या मंडळींचा मान ठेवायचा म्हणजे त्यांच्या अंधश्रद्धांचा मान ठेव्याचा असे होत असेल तर तो मान ठेवण्याच्या लायकीचा नाही, हे ओळखून त्याप्रमाणे निर्धाराने वागावे लागेल.
वाढत्या वयाचा शहाणपणा वाढण्याशी नैसर्गिक संबंध असतोच असे नाही. लोक गतानुगतिक असतात. मतपरिवर्तनाला सहजपणे तयार नसतात. त्यामुळे मित्रांचासुद्धा दुरावा पत्करावा लागेल. फुले मानायचे म्हणजे पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांत हि दरिद्री जनतेने दारिद्रयाविरुध्द बंड करून उठू नये म्हणून केलेली फसवणूक आहे हे मानावे लागेल. देवळातला देव दीनांचा वाली आहे या श्रद्धेने सारे काही आपोआप होईल ही भावना टाकून द्यावी लागेल. जन्माने ब्राम्हण असलेले तेवढे श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ असले माणसामाणसात भेद करणाऱ्या गीतेसारख्या ग्रंथांचे श्रेष्ठत्वदेखील आंधळेपणाने स्वीकारता येणार नाही. इतर चार मनुष्यनिर्मित ग्रंथांसारखेच सारे धर्मग्रंथ काही योग्य आणि काही चुकीच्या मतांनी भरलेले आहेत.
शंभर वर्षापूर्वी ज्या वेळी थोर विचारवंत म्हणवणारी मंडळी आपल्या बायकांना घरात चूल फुंकवत बसवायची, ज्यांच्या अस्तित्वाची दखलहि घेतली जात नसे अशा काळात, जोतिबांनी आपल्या बायकोला आपल्या सार्वजनिक कार्यात जोडीदारीण म्हणून ते कार्य करायला उत्तेजन दिले. महादेव गोविंद रानड्यांच्या पत्नीसारखे काही तुरळक अपवाद वगळले तर समाजसुधारकांनी आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांना घेतल्याचे उदाहरण नाही. तेव्हा जोतीबा मानायचे म्हणजे कुटुंबात स्त्री-पुरुषांचे समान हक्काने वागणे दिसायला हवे. एखाद्या स्त्रीचा नवरा मरण्याशी पापपुण्याचा संबंध नसून, त्या माणसाच्या रोगावर योग्य इलाज होऊ शकला नाही म्हणून तो मेला, एवढेच सत्य मानून त्या स्त्रीच्या कौटुंबिक आणि सामाजिक दर्जावर कसलाही अनिष्ट परिणाम होऊ न देण्याची खबरदारी घ्यावी लागेल. स्त्रीचे एक माणूस म्हणून जगणे आणि तिच्या कपाळी कुंकू असणे किंवा नसणे याचा परस्परसंबंध ठेवता येणार नाही. किंबहुना सर्व माणसांचा माणूस म्हणू विचार होईल, त्याच्यावर त्याला समजू लागण्यापूर्वीच हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन असली कसलीही लेबले चिकटवण्यात येत कामा नये.अशा प्रकारचा बुद्धीनिष्ठ आचरणाचा हा वारसा आहे.
कालचे धर्मग्रंथ कालच्या सामाजिक परिस्थितीप्रमाणे रचलेले असतात. ते आजच्या परिस्थितीला उपयुक्त नसतील तर ते रचणारे महापुरुष कोणीही असले तरी त्या ग्रंथांचा भक्तिभावाने स्वीकार करण्याची आवश्यकता नाही. ती माणसे कितीही थोर असली तरी माणसेच होती. ईश्वराचे अवतार वगैरे नव्हती. तीही चुका करू शकत होती. त्या त्या काळातले त्यांचे मोठेपण मान्य करूनही त्यांच्यात उणीवा होत्या हे ध्यानात ठेवायला हवे.
एकदा नामस्मरण सुरु झाले कि माणसाचा देव होतो आणि बुद्धीनिष्ठ चिकित्सेची हकालपट्टी होते. कृष्ण, राम यांसारख्या आपल्या महाकाव्यातल्या नायकांचे आम्ही देव केले. महात्मा गांधीची देवपूजाच सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या प्रखर बुद्धीनिष्ठांचीहि देव करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. फुल्यांचेही नुसतेच नामस्मरण करून त्यांनाही एकदा अवतारी पुरुषाच्या देव्हार्यात बसवले, कि आम्ही फुले आचरणात आणण्याच्या जबाबदारीतून सुटू. एकदा देव करून पूजा सुरु झाली, कि मूळ विचार दूर ठेवता येतात. जसे स्वच्छता हा मूळ हेतू दूर राहून वर्षानुवर्षे न धुतलेल्या पितांबराला सोवळे मानले जाते तसेच हेही आहे.
देव केला की देवपूजेचा थाट मांडणारे देवांचे दलाल भूदेव होऊन हजर. आज फुल्यांचा जयजयकार करणारे धूर्त राजकारणीही असेच पवित्र होऊ पाहताना दिसतात.

मी नास्तिक आहे.


मी नास्तिक आहे. कारण भारतीय घटनेने मला तो पर्याय निवडण्याचा अधिकार दिलेला आहे.
म्हणूनच माझ्या धर्माचे खरे नाव- ‘मानवता धर्म' असे आहे.
दुःख, संकट, आजार हे सगळे जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचा देव-धर्म, पाप-पुण्य, आत्मा-पुनर्जन्म याच्याशी काहीही संबध नाही. वैज्ञानिक प्रगतीने यातील बऱ्याच गोष्टी कमी केल्या आहेत, पुढेही कमी होत जातील. परंतू माणूस स्वतःच्या अविवेकीपणामुळे त्यात वेगाने भर घालत आहे.त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन, समता, बंधुता,न्याय या व अशा मुल्यांची जपणूक व पुरस्कार करून विवेकी समाजाकडे वाटचाल करणे, हा माझ्या नास्तिकत्वाचा गाभा आहे,असे मी मानतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, उपासना स्वातंत्र, संचार स्वातंत्र्य हे भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेले अधिकार आहेत.परंतू त्याने इतरांच्या अधिकारांवर आक्रमण होता कामा नये, ही मूलभूत अट आहे. म्हणून जेव्हा एखादा समूह वायू, जल, ध्वनी,विचार, आचार प्रदूषण करतो. सामाजिक स्वास्थ बिघडेल अशी कृती करतो,तेंव्हा त्याचा प्रतिकार करण्याचा मला घटनादत्त अधिकार आहे.
देव-धर्म या व्यक्तीगत बाबी असल्याने त्या जर समाजाच्या मुठभर स्वार्थी लोकांनी शोषणासाठी वापरल्या तर त्यांची चिकित्सा करणे हा माझा अधिकार आहे, हे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. तसेच मला इतर धर्मांच्या प्रभावाची व लोकसंख्येची भीती वाटत नाही.
खरेतर माझ्या मते देव-धर्म ही कालबाह्य संकल्पना आहे.१९८१च्या जनगणनेत निधर्मी लोकांची संख्या दिड लाख होती,ती २०११ च्या जनगणनेत 29 लाख झाली आहे.म्हणूनच मला धर्म चिकित्सेबरोबरच वैज्ञानिक दृष्टीकोन, मानवतावाद, चिकित्सक वृत्ती यांचा विकास करणे हे जास्त महत्वाचे कर्तव्य वाटते. लोकांतील चिकित्सक वृत्तीचा विकास केला म्हणजे लोक त्यांच्या त्यांच्या धर्माची चिकित्सा करतील.
शस्त्रांच्या उत्क्रांतीचा इतिहास पाहता विचार हे सर्वांत आधुनिक शस्त्र आहे; असे मला वाटते.सर्वच दहशतवादी लहान मुलांना, तरूणांना भावनिक आवाहने करून त्यांचे विचाराचे शस्त्र बोथट करत असतात व बंदुक हेच योग्य शस्त्र आहे असे बिंबवतात.आणि ते त्यात सध्या मोठ्या प्रमाणात यशस्वीही होत आहेत; असे वरवर पाहता दिसते.त्या अस्त्राला बोथट करायचे असेल तर आपणच समाजाला विचारांचे शस्त्र बनवायला आणि ते यशस्वीपणे चालवायचे प्रशिक्षण द्यायला हवे.
‘सर्व माणसे एकाच बापाची लेकरे आहेत.’
ही सर्वच धर्मांची शिकवण आहे. पण ती आचरणात कोणीच आणत नाही.त्यामुळे सर्वच धर्मांत असुरक्षिततेची भावना आहे.माझी नास्तिकता ही सर्व धर्मातील माणसांना आपले मानते, पण ही गोष्ट माझ्याही वागण्यात दिसत नसेल, तर सगळे मलाही त्यांचा शत्रूच समजतील. त्यामुळे माझ्या ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्या’मुळे ते दुरावणार नाहीत,याची काळजी मलाच घ्यावी लागेल आणि समता, बंधुता, आपुलकी, प्रेम यांच्या अभिव्यक्तीवर जास्त भर देऊन भविष्यात वाटचाल करावी लागेल.
(संकलित)

धर्मस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काय


धर्मस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काय.....??? यावर चिंतन करायला लावणारि एक संकलित पोस्ट... . लहानपणापासून आपल्या समाजात परंपरेचे अंधश्रध्देचे, देवाधर्माचे इतके डोस पाजले जातात की, ती व्यक्ती मोठी झाल्यावर त्यांच्या पूर्णपणे आहारी गेलेली असते. एखाद्या अमली पदार्थासारखा हा विषय त्यांच्या मनात आणि शरीरात भिनला जातो. ते स्वत: काही विचारच करू शकत नाहीत कारण त्यांना ह्या गोष्टीची बाबा, बूवा, साधू, महाराज तसेच धर्मवेडे यांनी इतकी भिती घातलेली असते की, इकडे आड तिकडे विहीर,धरलं तर चावते सोडलं तर पळते अशी बिचाऱ्यांची अवस्था होते. अशा परीस्थितीतून तुमच्या आमच्या सारखा विचारांनी त्या बुरसटलेल्या संस्कारांवर मात करून एखादाच बाहेर पडू शकतो . पण बऱ्याच लोकांच्या बाबतीत विचार करण्याची क्षमता प्राप्त झाल्यावरही त्यांना धर्माच्या कचाट्यातून बाहेर पडणे दुरापास्त होते; एवढे brainwashing त्या अजाणतेपणी झालेले असते. म्हणून मूल वाढवतांना त्याला जरी सर्व धर्मांची माहीती दिली, तरी त्याच्यावर आपल्याच धर्माचे रोपण करण्याऐवजी सज्ञान होईपर्यन्त विचार करायला वाव द्यायाला हवा. आणि तदनंतर त्यालाच ठरवू द्यावे कोणत्या धर्माचा स्विकार करायचा वा निधर्मी राहायचे ते.ह्यालाच व्यक्ती स्वातंत्र्य देणे मानतात. हेच खरे पालकत्व असे मला वाटते.

विवेकानंदांचे विचार


विवेकानंदांची अतिशय महत्त्वाची वाक्ये:-
✔ शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची
जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा
कर्तृत्ववान होय.
✔ स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च
करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही.
✔ प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु
आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची
अपेक्षा करू नका.
✔ जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा
आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म
करण्याची वेळ आली आहे.
✔ इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं
पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त
सुखी आणि समाधानी होऊ शकता.
✔ तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक
कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही
तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार
नाही.
✔ जीवनात एकदा ध्येय निर्धारित
केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,कारण
पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास
घडवीत नसतात.
✔ काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा
ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता , त्यात सर्वोचस्थानी पोहोचा.
✔ स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा
असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक
बाबिंचेच चिंतन सतत केले पाहिजे.
✔ घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत
नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त
केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.
✔ आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट
गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला
सुरवात केली की आपोआप आयुष्यात
चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.
✔ चुका सुधारण्यासाठी ज्याची
स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू
शकत नाही.
✔ जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं
अस काही तुम्हाला हवे आहे मग आजवर जे
काहीच केले नाही अस काही तरी करण्याची
तयारी ठेवा.
✔ बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ
शकत नाही आणि ज्यांना स्वत:च मन
बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू
शकत नाही.