माझ्या वाचकांसाठी...........
Wednesday, 25 March 2026
असा हवा... नवा महाराष्ट्र...
जगाला युद्ध नको बुदध हवा...
जगाला युद्ध नको बुद्ध हवा...
.
काश्मीर येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाना *भावपूर्ण श्रद्धांजलि.* मानाचा मुजरा आणि सलाम त्यांच्या शौर्याला....
एकंदरीत या घटनेमुळे देशातील व सर्व राज्यातील वातावरण ढवळुन निघालेले आहे. गल्लीपासुन दील्लीपर्यंत चर्चा झाली आणि पुन्हा एकदा आमचे सर्वांचे देशप्रेम उफाळुन आले.
एरव्ही आम्ही एकमेकांवर कुरघोड्या करत असतो, जातीवाद करत असतो, पण त्या निमित्ताने दोन मिनटासाठि का होइना पण आमची देशभक्ति जागृत झाली. आम्ही भारतीय आहोत याची जाणीव झाली.
मग नेहमीप्रमाणे आपला जन्मसिद्ध हक्क असल्यासारखा *मुसलमान चलेजाव* चा नारा घुमु लागला. आणि 'पाक'भावना जागृत झाल्या..... घरबसल्या आम्ही देशभक्ति ची भाषा बोलु लागलो, पाकिस्तान ला शिव्या हासडत बसलो पण कुणालाही वाटलं नाही कि आपण हि स्वातंत्र्य सैनिक होउन देशासाठी प्राणार्पण करावं. नाहीं वाटणार, कारण मरणाला प्रत्येक जण घाबरतो *दुस-याचा प्राण गेला तरी चालेल पण मी जगलो पाहिजे.* असंच प्रत्येकाला वाटत असते.
आराम खुर्चीत बसुन पाकिस्तान ला धडा शिकवण्याची गोळ्या घालण्याची भाषा आम्ही सहज बोलत असतो... का? तर आम्ही इथे सुरक्षित आहोत. पण जो माणुस स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता २४ तास मरणाच्या दारात उभा असतो त्याच्याबद्दल कधीच सहानुभूति वाटत नाही. आज प्रत्येक अविचारी माणुस युद्धाची भाषा बोलत असतो पण बोलण्याइतके युद्ध करणे सोपे नाहि हे समजायला हवं त्यासाठि एकदा स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेउन बघा पुन्हा तुमच्या तोंडुन *युद्ध* हा शब्द बाहेर पडणार नाही. आज हल्ल्यात १८ मारलेत उद्या युद्धात १८०० मरतील त्याचे काय.. त्याना कुटुंब, प्रेमभावना नाहित..? त्यांच्या कुटुंबीयाना एक रक्कम जाहिर केली म्हणजे आपल्याला फार मोठे सत्कार्य केले असे वाटते......
भगवान बुद्धांनंतर जगाला अहिंसेचा आणि शांततेचा महान संदेश देणारी महात्मा गांधीजी नावाची एक व्यक्ति या देशात होउन गेली यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. भगवान बुद्धानी एक लाख मोलाचा संदेश दिलाय, *द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही त्यासाठि प्रेमच हवं.* सध्यातरी जगाला तारणहार ठरणा-या दोनच गोष्टी आहेत एक म्हणचे *अहिंसेचा मार्ग* आणि दुसरी म्हणजे *शांततेचा संदेश*...............
आपला हितचिंतक
निळकंठ शांताराम तांबे
९४०४७७२२००
nilakanthatambe.blogspot.com
मला भावलेलं मुंबई चं रुप
◆ मला भावलेलं मुंबईचं रूप ◆
● मुंबई एक कामगार नगरी ●
आपल्या मातीशी जसं शेतकऱ्याचं घट्ट नातं निर्माण झालेले असतं तसंच काहीसं नातं आहे इथल्या मुंबईकराचे मुंबईशी. मुंबई या मायानगरीत आल्यावर प्रत्येक व्यक्ती त्या मायाजालात इतका अडकून जातो की पुन्हा सोडून जायचा विचार त्याच्या मनात कधीही येत नाही. हिच जादू आहे आपल्या मुंबईची. या मुंबईत येण्याचं एकमेव कारण काय असेल तर ही मुंबई कुणाही पामराला कधीही उपाशीपोटी ठेवणार नाही. म्हणूनच की काय कुणास ठाऊक सगळे पर्याय संपल्यानंतर शेवटचा उदरनिर्वाह करण्याचा पर्याय म्हणून आपल्या मुंबईकडे बघीतलं जातं. घड्याळाच्या काट्याप्रमाणे कधीही न थांबता इथला मुंबईकर या मायानगरीत कष्ट करत असतो. आणि स्वतः बरोबर आपल्या संपूर्ण कुटुंबाला संभाळत असतो.
'मुंबई मेरी जान
तुजपे दील कुर्बान'
हे इथला मुंबईकर मोठ्या अभिमानाने म्हणत असतो. आज जगातील अनेक ठिकणाहुन लोक कामानिमित्त मुंबईत ये-जा करत असतात हेच मुंबईचं. मोठेपण आहे. या मुंबईच्या जडणघडणीत मोठा वाटा कुणाचा असेल तर इथल्या नोकरदार वर्गाचा. देशाची आर्थिक राजधानी म्हणून जी काय बिरुदावली प्राप्त झालेली आहे याचं संपूर्ण श्रेय कुणाला जात असेल तर ते इथल्या कामगार वर्गाला. अगदी मुंबई ला साफसुथरी आणि सुंदर ठेवयायचं काम देखील हा कामगार वर्गच करत असतो. या कचरा कामगारांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत कारण त्यांच्यामुळे च तर मुंबईत निरोगी जीवन जगतोय. मुंबई नेहमी गजबजलेल्या अवस्थेत दीसते त्याचं मुख्य कारण आहे हा इथला कामगार वर्ग. पुरुषवर्ग जसा कामानिमित्त घराबाहेर पडतो त्याचप्रमाणे मुंबईतील स्त्रीवर्ग देखील कामानिमित्ताने मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो, हे इथले खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे एकंदरीत बघीतलं तर 'मुंबईतील कामगारवर्ग संपावर गेला तर' अशी कल्पना देखील आपण करु शकत नाही.
'ही मुंबई नेमकी आहे तरी
काय'
गरीबाला तारणारी आय, आणि
कष्टकरऱ्यांची माय'
गरिबांंपासून ते श्रीमंतांपर्यत प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचं महत्वपूर्ण कार्य ही मुंबई करत आली आहे, तीचं वर्णन करावं तेवढे थोडेच आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ला कोणते ना कोणते काम मिळतेच मग तो शिक्षित असो किंवा अशिक्षित, रीकाम्या हाताने माणूस मुंबईतुन कधीही परतत नाही हे सुद्धा एक वैशिष्ट्य च मानायला हवं. कोणतंही काम करताना लाजु नये असं.नेहमी म्हटलं जातं पण याचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला मुंबईत पहायला मिळते. अगदी गटारात उतरून गटारातील घाण काढायचं काम सुद्धा इथला कामगार मोठ्या अदबीने करतो यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारची लाज वाटत नाही हे विशेष. मुंबईतील सगळ्या गोष्टींंचा सारासार विचार केला तर कामगाराविना मुंबई अगदी काही मिनिटात ओस पडेल म्हणून मुंबईचं जे काही रुप आपण मोठ्या अदबीने पहात असतो यात मोठा वाटा कुणाचा असेल तर निश्चितपणे इथल्या कामगारांचा.
'मायानगरी ती अमुची,
हा जन्म तीच्यासाठी,
तीच अमुची करती, धरती
जशी आंधळ्याची काठी'
सकाळी उठल्यापासून घाईगडबडीत कामावर जाणारा प्रत्येक व्यक्ती जसा त्याच्या कुटंबासाठी, उदरनिर्वाहासाठी बाहेर पडतो तसा तो कामाच्या काळजीने देखील बाहेर पडत असतो. म्हणजे कामगाराचे मुंबईतील असणारे अस्तित्व कुणीही नाकारु शकत नाही. संपूर्ण मुंबई च्या जडणघडणीत ला मुख्य दुवा, सुशोभीकरणाचा 'हिरा' कोण असेल तर तो इथला कामगार, हे मी अगदी ताठमानेने ठामपणे सांगु शकतो.
छोट्यामोठ्या उद्योगधंद्यांपासुन ते छोट्यामोठ्या उद्योगपतींंपर्यंत सगळ्यांच मुंबई हेच. माहेरघर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आज बघायला गेलो तर सगळ्या उद्योगांचे बस्तान. हे कुठे बसवलं असेल तर तर ते मुंबईत त्यामुळे गावातील, खेड्यापाड्यातील तरुणांपासुन ते अगदी वयस्कर व्यक्ती सुद्धा या मुंबईकडे आकर्षली आहे. मुंबईची जी शान टिकून आहे ती या कामगारांमुळेच हे शाश्वत सत्य कधीही नाकारुन चालणार नाही.
स्वप्ने उराशी बाळगून इथे प्रत्येकजण आपापल्या परीने येत असतो आणि या स्वप्न पूर्तीसाठी फक्त आणि फक्त ईथे येऊन काम करत असतो. मुबईतील कामगार हाच मुंबई चा तारणहार आहे. त्याच्याशिवाय मुंबईतील पहाट उजाडणार नाही हे मान्य करावेच लागेल. असंख्य गोरगरिबांना काम मिळवून देण्यासाठी व याच कामगारांना आपल्या पोटात सामावून घेणारी ही मायानगरी कामगारांचे पाठबळच म्हणायला हवे. प्रत्येकाच्या हाताला काम देऊन ताठ मानेने जगण्याचं धाडस या मुंबईने करून दिले आहे.
'मी मुंबईकर या मायानगरीतला
मी कामगार या मुंबईचा,
कधी बंध ना तुटो या
आपुलकीच्या नात्याचा'
(स्मार्ट महाराष्ट्र या पोर्टल वर तृतीय पारितोषिक विजेता , निबंध)
निळकंठ शां. तांबे
मुंबई मालाड
9260797072
प्रबोधन ही काळाची गरज
Wednesday, 3 July 2024
उद्धवा अजब तुझे सरकार
उद्धवा अजब तुझे सरकार.....
.
बरिच संकटे येतात निघुन जातात आपण हि त्याच्यात स्वतःला सावरुन पुढील आयुष्याची वाटचाल करत असतो. एकंदरित आपल्याला वाटत असतं कि आपण संकटावर मात करत चाललोय पण खरं पाहता आपली संवेदनशीलता कुठेतरि लोप पावत चालल्याय
याचा आपण कुठेतरि कधीतरि विचार करायला हवा. मग माळिन सारखी दुर्घटना का असेना या सगळ्याची आपल्याला सवय होत चालली आहे. प्रत्येक वेळि कुणाला तरि काहि कालावधीसाठि दोष देत असतो. व नंतर विसरुन जातो. घडणारि प्रत्येक घटना एकतर ती मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित असते. पण कालची घडलेली #महाडदुर्घटना हि पुर्णपणे मानवनिर्मितच होती. आणि याला जबाबदार आहे हे आमचं बेजबाबदार सरकार...
शहाणे होण्यासाठि प्रत्येक वेळी आम्हि ठेच लागण्याचीच वाट बघत असतो, पण आम्ही असा कधीच विचार करत नाहि कि ती ठेच आपल्या जीवावार बेतु शकते. प्रत्येक वेळि सुधारणा करण्यासाठि कुणाच्या तरी मरणाचीच का वाट बघावी लागते...??? जो पर्यंत खड्ड्यात पडुन कोण मरत नाहि तो पर्यंत खड्डेदुरुस्ती नाही, जो पर्यंत पाणी भरत नाही तो पर्यंत नालेसफाइ नाहि... म्हणजे प्रत्येक वेळि काहितरि वाइट घडण्याचीच आम्ही वाट बघतो...... का ? तर आमचा नाकर्तेपणा...आणि मग वरातीमागुन घोडे नाचवण्यात आम्ही तरबेज आहोतच.... वाइट प्रसंग येउ नये म्हणुन कधी काळजी घ्यावी वाटली नाहि पण जर का का असा प्रसंग ओढावला कि मग बसतो दुस-यावर दोषारोप करत... #महाडदुर्घटना हि पूर्णपणे मानवनिर्मित होती आणि ती म्हणजे या शासनकर्त्यानी घडउन आणल्याय असं मी तरि स्पष्टपणे म्हणेन..... जो पर्यंत दुस-याच्या ठिकाणी आपण स्वतःला ठेउन बघणार नाहि तो पर्यंत त्याची भीषणता आपल्याला कधीच जाणवणार नाहि. जर त्याच ठिकाणी एखाद्या नेत्याच्या गाड्यांचा ताफा जर त्या पुलासोबत वाहुन गेला असता तर आमचं सरकार खडबडुन जागे झाले असते पण आज तेवढी काळजी त्याना सामान्या माणसाची नाहि हे या घटनेने सिद्ध करुन दाखवलं... जर तेवढी काळजी आमच्या शासन(ना)कर्त्याना असती तर आज हि वेळ आली नसती.. नेहमी प्रमाणे स्वतःला निर्दोष म्हणउन घेतीलच असो.......
पण या घटनेतुन एक गोष्ट मात्र पुन्हा एकदा सिद्ध झाली ती म्हणजे स्वस्त झालेले माणसाचे मरण....
.
निळकंठ शांताराम तांबे
९४०४ ७७ २२ ००
Saturday, 3 December 2016
नोटबंदी
निर्णय नोटबंदीचा.....*
नोटबंदीचा निर्णय झाला आणि सर्वप्रथम मला आठवण झाली ती श्रीमान रतनजी टाटा यांची. त्यांचे वाक्य मी आवर्जुन या ठीकाणी लिहीतोय..... *मी थेट निर्णय घेतो, तो चुक की बरोबर याचा फारसा विचार करत नाही पण निर्णय घेतला की त्याच्या परिपूर्णतेसाठी माझे अथक प्रयत्न चालु असतात.* कोणताही निर्णय घेतला की त्याप्रमाणे नियोजन करणे गरजेचे असते आणि त्याच्या पुढची पायरी ती म्हणजे त्याची अंमलबजावणी. नोटबंदी निर्णय फक्त आम्हाला दिसला पण त्याचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात सरकार पुर्णपणे अपयशी ठरलंय..... मी टिका करत नाही. घेतलेला निर्णय हा स्वागतार्य आहेच पण.. पुर्ण नियोजनाच्या आधारे काही प्रमाणात का होईना झालेला त्रास नक्कीच कमी करता आला असता.... नोटबंदीनंतर काही टीकाकार थेट पंतप्रधानांवर निषाणा साधु लागले. टिकाकारांचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे कोणतीही चांगली गोष्ट करा ते त्यातुन वाइटच शोधुन काढणार... असो.... प्रामाणिक पणे सांगायचे झाले तर सध्याचे पंतप्रधान हे इतरांच्या तुलनेत नक्कीच चांगले आहेत... आणि प्रत्येक वेळि टिका करुन चालत नाही *एखादी गोष्ट जर चुकीची वाटत असेल तर बरोबर काय आहे हे आपल्याला सांगणे जरुरी आहे नुसतं चुका काढणे योग्य नसतं*... आपल्याला जर पंतप्रधान चुकिचा वाटत असेल तर मला तर असं वाटतं सध्याच्या राजकारणात पर्यायी पंतप्रधान शोधणे अवघडच आहे. असा एकही व्यक्ति नाहीए जो पंतप्रधान या पदाला साजेसा आहे. मग जर एखाद्या गोष्टीला पर्याय च नसेल तर जी आहे ती चांगली कशी होईल या दृष्टिने विचार करुन तसा प्रयत्न करायला हवा.... सध्याच्या पंतप्रधानांचा विचार करता मनात कुठेतरी विश्वास निर्माण होतो की हा माणुस काही तरी बदल नक्की घडवुन आणेल... सगळ्यात महत्वाचे मी मोदी भक्त नाही त्यांचा पक्ष कोणता याच्याशी काहिएक देणघेणे नाही आणि आरएसएस शी माझा तिळमात्र संबंध नाही.... मोदी जी एक व्यक्ति म्हणुन मी त्यांचा आदर करतो आणि काही तरी चांगले घडउन आणतील अशी अपेक्षा बाळगतो....
.
आपला हितचिंतक
निळकंठ तांबे
९४०४ ७७ २२ ००
Wednesday, 14 September 2016
पु.ल.देशपांडे लिखित
जोतिबांना आपले द्रष्टे पूर्वज मानून त्यांचा वारसा सांगायचा असेल तर जात, वर्णवर्चस्व, मूर्तीपूजा असल्या गोष्टींचा त्याग आचरणाने सिद्ध करून दाखवावा लागेल. हे सोपे नाही. त्यासाठी आप्तस्वकीय आणि मित्रांचा दुरावा सहन करावा लागेल. वयाने वडील असलेल्या मंडळींचा मान ठेवायचा म्हणजे त्यांच्या अंधश्रद्धांचा मान ठेव्याचा असे होत असेल तर तो मान ठेवण्याच्या लायकीचा नाही, हे ओळखून त्याप्रमाणे निर्धाराने वागावे लागेल.
वाढत्या वयाचा शहाणपणा वाढण्याशी नैसर्गिक संबंध असतोच असे नाही. लोक गतानुगतिक असतात. मतपरिवर्तनाला सहजपणे तयार नसतात. त्यामुळे मित्रांचासुद्धा दुरावा पत्करावा लागेल. फुले मानायचे म्हणजे पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांत हि दरिद्री जनतेने दारिद्रयाविरुध्द बंड करून उठू नये म्हणून केलेली फसवणूक आहे हे मानावे लागेल. देवळातला देव दीनांचा वाली आहे या श्रद्धेने सारे काही आपोआप होईल ही भावना टाकून द्यावी लागेल. जन्माने ब्राम्हण असलेले तेवढे श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ असले माणसामाणसात भेद करणाऱ्या गीतेसारख्या ग्रंथांचे श्रेष्ठत्वदेखील आंधळेपणाने स्वीकारता येणार नाही. इतर चार मनुष्यनिर्मित ग्रंथांसारखेच सारे धर्मग्रंथ काही योग्य आणि काही चुकीच्या मतांनी भरलेले आहेत.
शंभर वर्षापूर्वी ज्या वेळी थोर विचारवंत म्हणवणारी मंडळी आपल्या बायकांना घरात चूल फुंकवत बसवायची, ज्यांच्या अस्तित्वाची दखलहि घेतली जात नसे अशा काळात, जोतिबांनी आपल्या बायकोला आपल्या सार्वजनिक कार्यात जोडीदारीण म्हणून ते कार्य करायला उत्तेजन दिले. महादेव गोविंद रानड्यांच्या पत्नीसारखे काही तुरळक अपवाद वगळले तर समाजसुधारकांनी आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांना घेतल्याचे उदाहरण नाही. तेव्हा जोतीबा मानायचे म्हणजे कुटुंबात स्त्री-पुरुषांचे समान हक्काने वागणे दिसायला हवे. एखाद्या स्त्रीचा नवरा मरण्याशी पापपुण्याचा संबंध नसून, त्या माणसाच्या रोगावर योग्य इलाज होऊ शकला नाही म्हणून तो मेला, एवढेच सत्य मानून त्या स्त्रीच्या कौटुंबिक आणि सामाजिक दर्जावर कसलाही अनिष्ट परिणाम होऊ न देण्याची खबरदारी घ्यावी लागेल. स्त्रीचे एक माणूस म्हणून जगणे आणि तिच्या कपाळी कुंकू असणे किंवा नसणे याचा परस्परसंबंध ठेवता येणार नाही. किंबहुना सर्व माणसांचा माणूस म्हणू विचार होईल, त्याच्यावर त्याला समजू लागण्यापूर्वीच हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन असली कसलीही लेबले चिकटवण्यात येत कामा नये.अशा प्रकारचा बुद्धीनिष्ठ आचरणाचा हा वारसा आहे.
कालचे धर्मग्रंथ कालच्या सामाजिक परिस्थितीप्रमाणे रचलेले असतात. ते आजच्या परिस्थितीला उपयुक्त नसतील तर ते रचणारे महापुरुष कोणीही असले तरी त्या ग्रंथांचा भक्तिभावाने स्वीकार करण्याची आवश्यकता नाही. ती माणसे कितीही थोर असली तरी माणसेच होती. ईश्वराचे अवतार वगैरे नव्हती. तीही चुका करू शकत होती. त्या त्या काळातले त्यांचे मोठेपण मान्य करूनही त्यांच्यात उणीवा होत्या हे ध्यानात ठेवायला हवे.
एकदा नामस्मरण सुरु झाले कि माणसाचा देव होतो आणि बुद्धीनिष्ठ चिकित्सेची हकालपट्टी होते. कृष्ण, राम यांसारख्या आपल्या महाकाव्यातल्या नायकांचे आम्ही देव केले. महात्मा गांधीची देवपूजाच सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या प्रखर बुद्धीनिष्ठांचीहि देव करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. फुल्यांचेही नुसतेच नामस्मरण करून त्यांनाही एकदा अवतारी पुरुषाच्या देव्हार्यात बसवले, कि आम्ही फुले आचरणात आणण्याच्या जबाबदारीतून सुटू. एकदा देव करून पूजा सुरु झाली, कि मूळ विचार दूर ठेवता येतात. जसे स्वच्छता हा मूळ हेतू दूर राहून वर्षानुवर्षे न धुतलेल्या पितांबराला सोवळे मानले जाते तसेच हेही आहे.
देव केला की देवपूजेचा थाट मांडणारे देवांचे दलाल भूदेव होऊन हजर. आज फुल्यांचा जयजयकार करणारे धूर्त राजकारणीही असेच पवित्र होऊ पाहताना दिसतात.