Wednesday, 3 July 2024

उद्धवा अजब तुझे सरकार

***माझ्या लेखनीतुन***
उद्धवा अजब तुझे सरकार.....
 .
बरिच संकटे येतात निघुन जातात आपण हि त्याच्यात स्वतःला सावरुन पुढील आयुष्याची वाटचाल करत असतो. एकंदरित आपल्याला वाटत असतं कि आपण संकटावर मात करत चाललोय पण खरं पाहता आपली संवेदनशीलता कुठेतरि लोप पावत चालल्याय
 याचा आपण कुठेतरि कधीतरि विचार करायला हवा. मग माळिन सारखी दुर्घटना का असेना या सगळ्याची आपल्याला सवय होत चालली आहे. प्रत्येक वेळि कुणाला तरि काहि कालावधीसाठि दोष देत असतो. व नंतर विसरुन जातो. घडणारि प्रत्येक घटना एकतर ती मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित असते. पण कालची घडलेली #महाडदुर्घटना हि पुर्णपणे मानवनिर्मितच होती. आणि याला जबाबदार आहे हे आमचं बेजबाबदार सरकार...
शहाणे होण्यासाठि प्रत्येक वेळी आम्हि ठेच लागण्याचीच वाट बघत असतो, पण आम्ही असा कधीच विचार करत नाहि कि ती ठेच आपल्या जीवावार बेतु शकते. प्रत्येक वेळि सुधारणा करण्यासाठि कुणाच्या तरी मरणाचीच का वाट बघावी लागते...??? जो पर्यंत खड्ड्यात पडुन कोण मरत नाहि तो पर्यंत खड्डेदुरुस्ती नाही, जो पर्यंत पाणी भरत नाही तो पर्यंत नालेसफाइ नाहि... म्हणजे प्रत्येक वेळि काहितरि वाइट घडण्याचीच आम्ही वाट बघतो...... का ? तर आमचा नाकर्तेपणा...आणि मग वरातीमागुन घोडे नाचवण्यात आम्ही तरबेज आहोतच.... वाइट प्रसंग येउ नये म्हणुन कधी काळजी घ्यावी वाटली नाहि पण जर का का असा प्रसंग ओढावला कि मग बसतो दुस-यावर दोषारोप करत... #महाडदुर्घटना हि पूर्णपणे मानवनिर्मित होती आणि ती म्हणजे या शासनकर्त्यानी घडउन आणल्याय असं मी तरि स्पष्टपणे म्हणेन..... जो पर्यंत दुस-याच्या ठिकाणी आपण स्वतःला ठेउन बघणार नाहि तो पर्यंत त्याची भीषणता आपल्याला कधीच जाणवणार नाहि. जर त्याच ठिकाणी एखाद्या नेत्याच्या गाड्यांचा ताफा जर त्या पुलासोबत वाहुन गेला असता तर आमचं सरकार खडबडुन जागे झाले असते पण आज तेवढी काळजी त्याना सामान्या माणसाची नाहि हे या घटनेने सिद्ध करुन दाखवलं... जर तेवढी काळजी आमच्या शासन(ना)कर्त्याना असती तर आज हि वेळ आली नसती.. नेहमी प्रमाणे स्वतःला निर्दोष म्हणउन घेतीलच असो.......
पण या घटनेतुन एक गोष्ट मात्र पुन्हा एकदा सिद्ध झाली ती म्हणजे स्वस्त झालेले माणसाचे मरण....
 .
निळकंठ शांताराम तांबे
 ९४०४ ७७ २२ ००

No comments:

Post a Comment